शिल्पा शिंदे बिग बॉस च्या या सिझन ची ची विजेता ठरेल का ? आज का शिल्पाचा जगभर बोलबाला आहे ?

बिग बॉस 11 च्या ग्रँड फिनाले अवघे 2 दोन दिवस उरले आहेत. कोण जिंकणार बिग बॉसचा 11 चा ताज याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. आकाश ददलानी आऊट झाल्या नंतर घरात चार फायनल कंटेस्टेंट उरले आहेत. हिना खान, विकास गुप्ता, शिल्पा शिंदे आणि पुनीश शर्मा. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकाराला सपोर्ट करण्यासाठी फॅन्स अॅक्टिव्ह पण झाले आहेत. सोशल मीडियावर बिग बॉसच्या विनरच्या वोटिंगला ट्रेंडमध्ये शिल्पा शिंदेचे नाव सगळ्यात वरती आहे. शिल्पाचे फॅन्स इतर कंटेस्टेंट पेक्षा जास्त आहेत यामध्ये दुम्मत नाही. शिल्पाच्या फॅन्स बद्दल बोलयाचे झाले तर सलमान खानच्या घरात सुद्धा सलमानची फॅन आहे. सलमान कोणाला सपोर्ट करतोय याचा खुलासा झाला नाही मात्र सलमानची आई शिल्पा शिंदेच्या परफॉर्मेंसवर खूप खूश आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सलमानची आई वाटते आहे की या सीझनची विजेती शिल्पा शिंदे व्हावी. आज ट्विटर वर शिल्पा शिंदेच्या समर्थनार्थ ट्रेंड करण्यात आला दीड मिलियन हून अधिक ट्वीट करून हा ट्रेंड करण्यात आला या ट्रेंड मुळे सध्या शिल्पा जिंकू शकते असे बऱ्याच जणांना वाटते. दरम्यान काही दिवसांपूर्वी वुई लव्ह शिल्पा शिंदे असा हॅशटॅगचा वापर करत तिच्या फॅन्सने अनेक ट्वीट केले होते.तो हि ट्रेंड हिट झाला होता.

Loading...


काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर असंख्य भूमिका आणि व्यक्तिरेखांमधून शिल्पा चमकत आली आहे. लाडकी भाभी साकारल्या नंतर तिला प्रसिद्धी मिळाली आणि मग शिल्पा शिंदेचे नाव प्रसिद्ध झाले. या वर्षी, बिग बॉस 11 मधील तिचा प्रवास वर्तमानपत्रांची हेडलाइन बनली आहे.
बिग बॉस हाऊसच्या पहिल्या विस्फोटक वीकमध्ये शिल्पाने प्रेक्षकांना तिची धैर्यवान आणि आक्रमक बाजू दाखविली होती. पण, काही काळानंतर ती घरामध्ये स्थिर झाली आणि तिने आईची भूमिका अंगिकारली आणि पालनपोषणाची गुणवत्ता दाखवली. किचनची जबाबदारी स्विकारून शिल्पाने बिग बॉसच्या घरातील प्रत्येकाला चांगले जेवण मिळेल याची काळजी घेतली. मेगास्टार सलमान खानचे सुद्धा त्याकडे लक्ष गेले आणि त्याने तिच्या नावाचा उल्लेख बिग बॉस हाऊस 11 की माँ असा केला. तिने बनविलेल्या 6000 चपात्यांचा विनोद व्हायरल झाला आहे.
तिचे विकास सोबत झालेल्या भांडणाने प्रत्येकजण सावध झाला होता, पण तिच्या क्षमाशील आणि समजूतदार स्वभावामुळे विकासने त्याच्या मागील वर्तनाविषयी माफी मागितली आणि त्या दोघांनी तो वाद संपवला. विकासने तर त्याच्या आगामी सिनेमामध्ये शिल्पाला भूमिका ऑफर केली आहे. अर्शीच्या सुटकेसाठी शिल्पा गेली होती, तरीही तिने शिल्पाच्या बाजूला जास्त वेळ न राहण्याचा निर्णय घेतला आणि मैत्री चंचल असते ही गोष्ट अर्शी खानने सिद्ध केली आहे.
मागील जवळपास 15 वर्षांपासून शिल्पा या इंडस्ट्री मध्ये आहे. पण एकदा बोलताना ती म्हणाली आहे, “ होय, माझ्या आधीच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या. पण मला असे वाटते की बिग बॉसने माझ्यातील खरी शिल्पा बाहेर काढली आहे.”