याकारणासाठी न्यूज अँकरने मुलीला स्टुडिओत बसवून केले लाईव्ह अँकरिंग जगभरात व्हिडिओ होतोय वायरल

पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात ८ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेविरोधात पाकिस्तान मध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर तिथे उग्र स्वरूपाचे आंदोलन सुरू आहे आणि या घटनेचा पाकिस्तान मधील एका टीव्ही Channael च्या न्यूज अँकरने वेगळ्या प्रकारे विरोध केला आहे. या वृत्तनिवेदिकेने आपल्या लहान मुलीला स्टुडिओमध्ये सोबत घेऊन बलात्कार प्रकरणाची बातमी वाचली.खालील व्हिडीओ मध्ये आपण ती बातमी पाहू शकता जिच्यामुळे जगभरात हि बातमी पोहचली

Loading...

किरण नाज असं या न्यूज अँकर नाव आहे. ती ‘समा टीव्ही’साठी न्यूज अँकरिंगचे काम करते. बलात्कारची बातमी वाचताना किरण भावूक झाली. मी आज या वाहिनीची वृत्तनिवेदिका म्हणून नाही तर एक आई म्हणून बोलतेय म्हणूनच मी माझ्या मुलीला घेऊन वृत्तनिवेदन करणार असल्याचं किरण म्हणाली. ‘या मुलीचे आई-वडिल सौदी अरेबियामध्ये धार्मिक यात्रेसाठी गेले होते, एकीकडे ते आपल्या मुलीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते आणि दुर्दैव म्हणजे त्याच काळात या चिमुकलीवर बलात्कार झाला आणि तिला मारुन फेकून देण्यात आले.” असंही ती म्हणाली. यासोबतच तिने मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. आज एका चिमुकलीचा नाही तर माणुसकीचा गळा घोटला गेला, असं ती म्हणाली. तिच्या या बातमी मुळे पाकिस्तानभर वातावरण तापले आहे. आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळायला हवी म्हणून मोठे आंदोलन सुरु झाले आहे. पिडीत मुलीच्या घरच्यांनी आरोपीला शिक्षा होत नाही तो पर्यंत मृतदेहाचा अंतिम संस्कार करणार नाही असे जाहीर केले आहे.