माझे बाबा मुख्यमंत्री असल्याने जेनेलिया मला २ दिवस शूटिंग दरम्यान बोलत नव्हती

तुझे मेरी कसम या चित्रपटाला 15 वर्ष झाली आहेत त्यानिमित्ताने रितेश देशमुख यांनी या चित्रपटाबद्दल काही आठवणी व्यक्त केल्या. या चित्रपटात भूमिका करणारी जेनेलिया तेव्हा कशी वागत होती हे पण त्याने लिहिले आहे. तुझे मेरी कसम हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला तसाच या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश जेनेलिया यांची प्रेम कहाणी पण फुलली.

Loading...

रितेश आणि जेनेलियाची भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. यावेळी 16 वर्षीय जेनेलिया तिच्या आईसोबत होती. मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फारच अॅटीट्युड असणार असे जेनेलियाला वाटत होते त्यामुळे जेव्हा रितेश आला आणि त्याने जेनेलियासोबत हातमिळवणी केली त्याच्यानंतर तीने अगोदरच त्याला अॅटीट्युड द्यायला सुरुवात केली. रितेशला जेनेलिया ऑकवर्ड असल्याचे वाटले पण जेनेलियाच्या आईसमोर अतिशय नम्रपणे रितेश वागत होता. पण मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्या कारणाने जेनेलिया रितेश सोबत दोन दिवस बोलली नाही.

दोन दिवसांनी रितेश सोबत जेनेलिया बोलली तिने त्याला विचारले तुझे संरक्षण करणारे सुरक्षारक्षक कुठे आहेत.तिला असे वाटले होते की रितेश हा मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने त्याला पूर्ण वेळ संरक्षण असेल.
रितेश आणि जेनेलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे केले. शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेश जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्याला आणि जेनेलिया एकमेकांना मिस करु लागले आणि त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे चालु केले. यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही. दोघे एकमेकांना भेटायचा नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत

रितेश आणि जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जेनेलिया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला आज दोघांचा संसार सुखाचा सुरू आहे त्यांना दोन मुले आहेत.