यांच्या आशीर्वादाने स्टारचा सुपरस्टार झालो – अभिनेता रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल चाहत्यांच्या मनात प्रचंड आदर आणि क्रेझ आहे. त्यांचा कुठलाही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांचे चाहते पहिल्याच दिवशी चित्रपटगृहाबाहेर हाउसफुलचे बोर्ड लावतात. पण एवढे मोठे स्टारडम त्यांना कसे मिळाले? ते स्टारचे सुपरस्टार कसे झाले? याचा प्रवास त्यांनी नुकताच उघड केला. होय, महावतार बाबांच्या गुहेचे दर्शन घेतल्यानंतर अभिनेता रजनीकांत यांना चित्रपटांमध्ये यश मिळत गेले. त्यांनी एका वेबसाइटशी बोलताना सांगितले की, ‘परमहंस योगानंदजी योगी कथामृत वाचल्यानंतर मी बारा वर्षांपूर्वी ‘बाबा’ नावाच्या एका चित्रपटाची निर्मिती केली होती.

Loading...

हा चित्रपट तामिळ भाषेत होता. चित्रपट चांगला होता, परंतु लोकप्रियता मिळवू शकला नाही. त्यानंतर मी द्वाराहाट योगदा आश्रम येथे गेलो आणि बाबांच्या गुहेत ध्यानमग्न झालो. बाबांचे आशीर्वाद घेतल्यानंतर माझे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. रजनीकांत यांनी रविवारी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले की, महावतार बाबांच्या गुहेत आल्यानंतर माझ्यातील आध्यात्मिक चेतना प्रबळ झाली आहे. येथील वातावरण आणि आध्यात्मिक तरंगांमधून मला नवी ऊर्जा मिळते. जेव्हा पूर्वेत माझे चित्रपट चालत नव्हते, तेव्हा गुफेत येऊन मी बाबांचे आशीर्वाद घेतले. तेव्हापासून मला चित्रपटांमध्ये यश मिळत गेले. दरम्यान, रजनीकांत यांनी महावतार बाबा यांच्याकडे त्यांच्या आगामी ‘काला’ आणि ‘२.०’ या चित्रपटांच्या यशासाठी शुभकामना केली. तसेच भविष्यातही याठिकाणी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *