दक्षिण भारतातील पोंगल सणाबद्द्ल हे महित आहे का ?

भारत विविध संस्कृतीची भूमी म्हणून ओळखली जाते. भारतात विविध भाषा, धर्म, संस्कृती असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील संस्कृतींबरोबरच उत्सव करण्याच्या वेगळ्या पद्धती दिसून येतात. आपल्याकडे महाराष्ट्रात मकर संक्रांत सण तिळगुळ वाटून व पतंग उडवून साजरा करतात, आज दक्षिण भारतात म्हणजेच तामिळनाडू व आन्ध्रप्रदेशातील काही भागात “पोंगल” हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  पोंगल बद्दल उत्तर भारतातील आपल्यापैकी काहींना या उत्सवाबद्दल माहित नसल्यामुळे मी थोडक्यात या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

Loading...

पोंगल काय आहे ?

पोंगल हा चार दिवसांचा लावणीचा सण आहे जो तामिळनाडू मध्ये साजरा केला जातो. जो थाई महिन्यात (म्हणजेच जानेवारी-फेब्रुवारी हंगामात) येतो तेव्हा तांदूळ, ऊस, हळद इ. सारख्या पिकांची कापणी होते.तामिळ भाषेतील ‘पोंगल’ या शब्दाचा अर्थ “उकळणे” असा होतो आणि हा उत्सव शेतातील आलेल्या पिकांच्या कापणीसाठी आभारप्रदर्शन म्हणून साजरा केला जातो. पोंगल हा सण महत्त्वाच्या हिंदू सणांपैकी एक असून दरवर्षी लोहडीच्या काळात येतो, जे जानेवारीच्या मधोमध आहे.
पोंगल हा उत्सव या वेळेत खाल्ल्या जाणाऱ्या एका “डिश”चे नाव देखील आहे,

पोंगल- द भोगी उत्सवाचा (पहिला दिवस)

भोगी उत्सव पावसाळ्यातील देवदेवतांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, आणि प्रभूंचा सन्मान केला जातो. भोगीमंटलूचा धार्मिक विधीही आजही पाळला जातो, ज्यामध्ये घराच्या निरर्थक वस्तू परंपरेने असलेल्या शेणाच्या गोवऱ्या व लाकडं एकत्र करून जळतात. (होळी सारखं)

थाई पोंगल – (दुसरा दिवस)

या दिवशी, एक विशेष रीतिरिवाज केला जातो. मातीची भांड्यामध्ये भात आणि दुध एकत्र केल्या जाते ज्यामध्ये हळदीचे रोप तयार झालेले असते. सूर्य देव यांना अर्पण करण्यासाठी खुल्या स्वरूपात ठेवतात, याबरोबरच ऊस, नारळ आणि केळीचीही काठीही दिली जाते.
या दिवसाचे आणखी एक महत्वाचे पैलू आहे कोलाम, पारंपारिक डिझाइन, ज्याने घराच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढली जाते. सकाळी लवकर आणि फक्त अंघोळी नंतरच रांगोळी काढणे आवश्यक आहे.

(तिसऱ्या दिवशी) – मट्टू पोंगल मट्टू पोंगल हा दिवस गायींचा दिवस (आपल्याकडे पोळा) म्हणून साजरा केला जातो. गुरांच्या गळ्यात घंटा, मणी आणि अंगावर माळांची झुली टाकल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते.

(चौथ्या दिवशी) – काणम पोंगल : काणम (किंवा कानू) पोंगल याला पोंगलचा शेवटचा दिवस त्या दिवशी, एक धार्मिक विधी पार पाडली जाते जिथे उरलेला गोड पोंगल आणि इतर अन्न अंगणामध्ये हळदीचा पानावर, पान, सुपारी, साखर व ऊस यांच्यासह, बाहेरच्या भागात ठेवले जातात.
घरगुती महिला त्यांच्या समृद्धीची मागणी करून, आपल्या बांधवांच्या नावाखाली ही विधी पार पाडतात.

जयपाल गायकवाड,
हैदराबाद.