नोकरी व स्पर्धा परिक्षेच्या विश्वासार्ह माहितीसाठी महासंवाद.

सध्या शासकीय नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांकडून सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना विविध वृत्तपत्रे व वेबसाईटवरील खोट्या जाहिरातींच्या माध्यमातून नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटनांत अनेकांची आयुष्ये उध्वस्त झाल्याची उदाहरणे सर्वांसमोर आहेत.

Loading...

शासनाच्या वतीने वेळोवेळी अशा खोट्या जाहीरातींवर विश्वास न ठेवण्याचे व खोट्य़ा जाहिरातींना न भुलण्याचे आवाहन करण्यात येते. तसेच राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहकार्याने ‘महान्युज’ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींसाठी नोकरी आणि स्पर्धा परिक्षेची अद्यावत व अधिक विश्वासार्ह माहिती उपलब्ध करुन दिली जाते.

ही गोष्ट लक्षात घेऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सहकार्याने ही नोकरी विषयक विश्वासार्ह माहिती Being Marathi टीम आपल्यासाठी घेऊन येत आहे. तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी खोट्या जाहिरातींना बळी न पडता शासनाच्या अधिकृत महान्युज वेबसाईटवरील जाहिरातींचा वापर करण्याचे आवाहन Being Marathi टीमच्या वतीने करण्यात येत आहे.