…आणि बापासमोर मला खाऊ दया ,थंडी वाजते -जवळ घ्या म्हणत एकुलत्या ‘ दक्ष ‘ ने सोडला प्राण

एकुलता एक असल्याने मुलाचे सर्व हट्ट पुरवलेल्या आपल्या लाडक्या मुलाची खाऊ देण्याची ,जवळ घेण्याची आर्त विणवणी केवळ भिंतीपालिकडून हतबल होऊन ऐकत मुलाचा मृत्यु पहाण्याची अतिशय वाईट वेळ राशिवडे (ता. राधानगरी )येथील संग्राम पाटील या दुर्दैवी पित्यावर आली .चार महिन्यापूर्वी झालेला श्वानदंश ध्यानात न आल्याने आणि अतिशय उशिरा रैबीज या जीवघेण्या संसर्गाचे निदान झाल्याने कु दक्ष संग्राम पाटील या दहा वर्षाच्या चिमुकल्याचा आज CPR रुग्णालयात हदयद्रावक अंत झाला आणि शेकडो मृत्यु पाहिलेले CPR ही या धक्कादायक मृत्यु ने शहारले दरम्यान ,दक्ष च्या रेबीज ने झालेल्या मृत्यु ने आरोग्य विभाग ही धास्तावला असून आज सायंकाळी तातडीने दक्ष चा परिवार,वर्गमित्र आणि सवंगडी अशा सत्तर हुन अधिक व्यक्तीना रेबीज प्रतिबंधक लस टोचन्यात आली आहे.

Loading...

या दुर्दैवी आणि दुर्मिळ दुर्घटनेची माहिती अशी ,राशिवडे येथील संग्राम पाटील हे भोगावती साखर कारखान्यात नोकरी करतात. त्यांचा एकुलता सुपुत्र कु दक्ष गावातील परशुराम विद्यालयात चौथीत शिकत होता अतिशय खेळकर आणि सर्वांचा लाड़का असलेल्या दक्ष ने चार महिन्यापूर्वी एक दिवस गल्लीत एका कुत्राच्या नखी ओरबडल्याचे घरी सांगितले होते .बाब किरकोळ असल्याने त्याच्यावर जुजबी उपचार करण्यात आले
त्यानंतर गेले चार महीने दक्ष चे शाळेत जाणे, खेळणे-बागडणे सुरूच होते .दोन दिवसापूर्वी मात्र हात-पाय दुखतात म्हणून तो घरी आला.अचानक मंगळवार पासून त्याची लक्षणे बिघडली तो उजेडाला घाबरु लागला,अंग दुखतय म्हणून रडु लागला,एकटाच कोपरयात बसु लागला .त्याला गावातील खाजगी दवाखान्यात दाखवल्यावर रेबीज ची लक्षणे डॉक्टरांच्या ध्यानी आली आणि दक्ष ला चार महिन्यापूर्वी कुत्र्याने नखी ने ओरबडले नव्हते तर चावा घेतला होता हे स्पष्ट झाले .त्याला तातडीने कोल्हापुरात CPR मधे दाखल करण्यात आले.

मात्र खुप उशीर झाला असल्याचे आणि दक्ष रेबीज चा बळी ठरला असल्याचे तेथील डॉक्टर नी सांगितले आणि पाटील कुटुंबावर आभाळ कोसळले
रेबीज चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्ष ला नाइलाजाने एकट्याला अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आले त्याला जेवण-पाणी देण्यास निर्बंध घालण्यात आले .दक्ष चे बाबा हताशपणे खोलीबाहेर थांबून त्याला हाक देत धीर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते तर दक्ष आतून , बाबा मला खुप थंडी वाजतेय मला जवळ घ्या ना ! मला भूक लागलीय खायला दया ना अशी आर्त विनवणी करत होता.
लहानपणापासून दक्ष चे सर्व हट्ट पुरवलेले संग्राम पाटील दक्ष ने फोडलेला टाहो ऐकुनही असहाय्य आणि हतबल बनले होते !
अखेर काही तासातच चिमुकल्या दक्ष ने बाबांचा आणि जगाचाही निरोप घेतला आणि ते निष्पाप बाळ अंधार कोठडीत कायमचे झोपी गेले !
दक्ष तुला भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुझ्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची परमेश्वर शक्ति देवो ही इश्वरचरणी प्रार्थना